जिल्ह्यात आज सकाळी आणखी ४० रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२७११ झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी पहिल्या टप्प्यात आलेल्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात १२७११ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ७७५३ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ४३२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर सध्या ४५२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शहरात आढळले २२ रुग्ण
शहरात २२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मुकुंदवाडी १, जालाननगर ४, अंबिकानगर, गल्ली नं. ८, मुकुंदवाडी १, निशांत पार्क परिसर, बीड बायपास १, एमजीएम परिसर २, हर्सुल १, मारोतीनगर, सिडको एन सहा १, बापूनगर, खोकडपुरा १, कोकणवाडी २, जवाहार कॉलनी १, एन आठ सिडको १, नारेगाव २, म्हाडा कॉलनी ३, शिवाजीनगर १ या भागात रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागात १८ रुग्ण
ग्रामीण भागात १८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सिडको वाळूज महानगर १, राजीव गांधीनगर, खुलताबाद १, लाडगाव रोड, वैजापूर ८, हिंगोनी, वैजापूर.१, घायगाव, वैजापूर १, निवारा नगरी, वैजापूर १, साई नाथ कॉलनी, वैजापूर १, चिंचडगाव, वैजापूर १, मुळे गल्ली, वैजापूर १, बेलगाव, वैजापूर १, दुर्गानगर, वैजापूर १ या भागात रुग्ण आढळून आले आहेत.










